
- राम मंदिरात नमाज पडण्याच्या प्रयत्नात अटक
अयोध्या, 10 जानेवारी (हिं.स.) : अयोध्येतील श्रीराम मंदिरात नमाज पठणाच्या प्रयत्ना असलेल्या अबू अहमद शेख नामक इसमाला आज, शनिवारी अटक करण्यात आली. सदर इसम जम्मू-काश्मीरच्या शोपियां परिसरातील आहे. त्यामुळे त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे का, अशा अँगलने सुरक्षा यंत्रणांनी अबूची चौकशी सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या शोपिया येथील अबू अहमद शेख नामक 56 वर्षीय इसमाने अयोध्येती श्रीराम मंदिराच्या आवारात अवैध प्रवेश केला. मंदिरातील ‘सीता की रसोई’ परिसरात त्याने नमाज पठनाचा प्रयत्न केला. यावेळी सतर्क असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला तत्काळ हटकले आणि नमाज पठनापासून मज्जाव केला. यावेळी अबू ने धार्मिक घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित सुरक्षा दलाने त्याला ताब्यात घेऊन रामजन्मभूमी पोलिस ठाण्यात सोपवले. यावेळी पोलिस आणि गुप्तचर संस्थांच्या चौकशीत या इसमाचे नाव अबू अहमद शेख असून तो जम्मू-काश्मीरच्या शोपिया येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली.
अयोध्येचे एसपी बलरामचारी दुबे यांनी अबूला अटक करून चौकशी सुरू केल्याचे सांगितले. तर एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर म्हणाले की, हा इसम जम्मू-काश्मीरच्या शोपिया येथील रहिवासी असून त्याचे नाव अबू अहमद शेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, तो राम मंदिर परिसरात नेमका कुठून आणि कसा आला, त्याचा नेमका हेतू काय होता, त्याचे कुणा-कुणाशी लागेबांधे आहेत या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी अबू अहमदची सखोल चौकशी सुरू असल्याचे ग्रोवर यांनी सांगितले. दरम्यान या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने सध्या कोणताही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तसेच राम मंदिर ट्रस्टने देखील संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी