फोनपे पेमेंट गेटवेने 'पीजी बोल्ट' केले लाँच
मुंबई, 13 जानेवारी, (हिं.स.)। फोनपे पेमेंट गेटवेने व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट तसेच डेबिट कार्ड व्यवहारांसाठी ‘फोनपे पीजी बोल्ट’ हे नवं वैशिष्ट्य लाँच केलं असून या सोलीउशनमुळे इन-ॲप चेकआउट प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. डिव्हाइस
PhonePe


मुंबई, 13 जानेवारी, (हिं.स.)। फोनपे पेमेंट गेटवेने व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट तसेच डेबिट कार्ड व्यवहारांसाठी ‘फोनपे पीजी बोल्ट’ हे नवं वैशिष्ट्य लाँच केलं असून या सोलीउशनमुळे इन-ॲप चेकआउट प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

डिव्हाइस टोकनायझेशन तंत्रज्ञानावर आधारित या प्रणालीत वापरकर्ते एकदाच आपले व्हिसा किंवा मास्टरकार्ड कार्ड टोकनायझ करून सेव्ह करू शकतात आणि नंतर फोनपे पीजीशी जोडलेल्या कोणत्याही व्यापाऱ्याकडे पुनःपुन्हा तपशील भरायची गरज न पडता सहज पेमेंट करू शकतात. संवेदनशील कार्ड माहितीच्या जागी सुरक्षित टोकनचा वापर केल्याने पुढील व्यवहारांमध्ये त्याच डिव्हाइसवर सीव्हीव्ही टाकण्याची आवश्यकता नसते आणि त्यामुळे पेमेंट प्रक्रिया एक ते दोन सेकंदांत पूर्ण होऊ शकते. पारंपरिक चेकआउटमध्ये होणारे रीडायरेक्ट्स आणि अतिरिक्त पायऱ्या टळत असल्याने ड्रॉप-ऑफ रेट कमी होऊन व्यापाऱ्यांच्या व्यवहाराच्या यशाचे प्रमाण वाढण्यासही मदत होणार आहे. फोनपेच्या नेटिव्ह एसडीकेद्वारे व्यापाऱ्यांना अधिक वेगवान चेकआउट, कमी तांत्रिक हँड-ऑफ्स आणि त्यांच्या ॲप फ्लोशी सुसंगत असा कस्टमायझेबल इंटरफेस उपलब्ध होईल.

कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी (व्यापारी व्यवसाय) युवराज सिंह शेखावत यांनी हे लाँच लाखो भारतीयांसाठी डिजिटल पेमेंट्स सोपं करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगत सुरक्षित, वन-क्लिक पेमेंट अनुभवामुळे वापरकर्त्यांची सोय आणि व्यापाऱ्यांच्या वाढीच्या संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त केला.

‘फोनपे पीजी बोल्ट’ हे PCI DSS प्रमाणित असल्यामुळे डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित होते. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या झपाट्याने वाढणाऱ्या मागणीनुसार डिव्हाइस टोकनायझेशन हा भविष्यातील महत्त्वाचा पेमेंट ट्रेंड ठरत असून फसवणूक कमी करण्यास आणि वापरकर्त्यांचा विश्वास वाढवण्यास मदत करतो.

यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेंट्सच्या यशाच्या पार्श्वभूमीवर या नव्या वैशिष्ट्यामुळे कॅशलेस अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी जलद, सुरक्षित व्यवहाराचा नवा मानदंड प्रस्थापित होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande