राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांतक्का यांना मातृशोक
मातोश्री श्रीमती राजम्मा यांचे बंगळुरू येथे निधन बंगळुरू, 13 जानेवारी (हि.स.)। राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीया शांतक्का जी यांच्या मातोश्री श्रीमती राजम्मा जी यांचे मंगळवार, दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता कर्नाटकातील बंग
श्रीमती राजम्मा जी


मातोश्री श्रीमती राजम्मा यांचे बंगळुरू येथे निधन

बंगळुरू, 13 जानेवारी (हि.स.)। राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीया शांतक्का जी यांच्या मातोश्री श्रीमती राजम्मा जी यांचे मंगळवार, दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता कर्नाटकातील बंगळुरू येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 106 वर्षांच्या होत्या.

श्रीमती राजम्मा जी यांचे जीवन त्याग, सेवा आणि राष्ट्रभक्तीचे जिवंत प्रतीक होते. राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्यांना सदैव त्यांचे ममत्व, प्रेमळ मार्गदर्शन व आशीर्वाद लाभत राहिले. त्यांनी आपले संपूर्ण स्त्रीधन स्वातंत्र्यलढ्यास अर्पण केले होते. त्यानंतर आयुष्यभर त्यांनी कधीही सुवर्णालंकार धारण केले नाहीत. त्यांचे हे त्यागमय आचरण कुटुंबासह संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरले.

त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे त्यांच्या अपत्यांना समाज व राष्ट्रसेवेसाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री नागराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. द्वितीय चिरंजीव मंजुनाथ व त्यांची धर्मपत्नी सुमाजी हे आदर्श गृहस्थाश्रमाचे पालन करत आपले जीवन सार्थक करीत आहेत. त्यांच्या कन्या वंदनीया शांतक्का राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका म्हणून आपले दायित्व कुशलतेने पार पाडत आहेत. श्रीमती राजम्मा जी यांचे संपूर्ण जीवन भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील अशी भावना संघ परिवारात व्यक्त केली जातेय.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande