राजस्थानमधील खुनाचा फरार आरोपी मोर्शीत पकडला
अमरावती, 13 जानेवारी (हिं.स.)। मोर्शी येथे राजस्थानमधील खुनाच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद इसहाक मोहम्मद शफी लोहार (वय ३८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिर, नागद्वारा पोलीस ठाण्याच्या ह
राजस्थानमधील खुनाचा फरार आरोपी मोर्शीत पकडला:श्रीनाथजी मंदिर परिसरातील गुन्ह्यात राजस्थान पोलिसांकडून अटक


अमरावती, 13 जानेवारी (हिं.स.)।

मोर्शी येथे राजस्थानमधील खुनाच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद इसहाक मोहम्मद शफी लोहार (वय ३८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिर, नागद्वारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तो फरार झाला होता.आरोपी मोहम्मद इसहाक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये राजस्थानमध्ये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता आणि राजस्थान पोलीस त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, हा आरोपी मोर्शी येथे लपून बसल्याची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ मोर्शी पोलिसांशी संपर्क साधला. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून मोहम्मद इसहाकला मोर्शी शहरातून ताब्यात घेतले.

मोर्शी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, स्वप्निल बायस्कर आणि अथर्व कोहळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande