शेअर बाजार गुरवारी राहणार बंद
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी 2026 रोजी देशातील शेअर बाजार बंद राहणार आहेत. NSE आणि BSE दोन्हीने याबाबत अधिकृत घोषणा करत कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये पूर्ण ट्रेडिंग हॉलिडे जाहीर केला
NSE  BSE


मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी 2026 रोजी देशातील शेअर बाजार बंद राहणार आहेत. NSE आणि BSE दोन्हीने याबाबत अधिकृत घोषणा करत कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये पूर्ण ट्रेडिंग हॉलिडे जाहीर केला आहे. राज्य सरकारने 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी घोषित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून यात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांचाही समावेश आहे.

सुरुवातीला 15 जानेवारी हा केवळ सेटलमेंट हॉलिडे राहील, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र नंतर सुधारित परिपत्रक जारी करून NSE ने कॅपिटल मार्केटमधील सर्व व्यवहार त्या दिवशी बंद राहतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग, करन्सी आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्जमध्ये व्यवहार होणार नाहीत. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये सकाळची सत्रे बंद राहतील. सरकारी अधिसूचनेनुसार मुंबई शहर आणि उपनगरांतील सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका आणि इतर संस्था देखील बंद राहतील.

बाजार बंद राहिल्यामुळे ट्रेडर्सना आपली पोझिशन्स आणि सेटलमेंटचे नियोजन करावे लागणार आहे. 14 व 15 जानेवारीला झालेले व्यवहार 16 जानेवारी रोजी सेटल होतील, तसेच MTF किंवा BTST पोझिशन्समध्ये 15 तारखेला विक्री करता येणार नाही. इक्विटीसह डेट आणि करन्सी सेगमेंटमध्येही ट्रेडिंग हॉलिडे राहणार असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

२०२६ मध्ये किती दिवस शेअर बाजार बंद?

२०२६ या वर्षात शेअर बाजार एकूण १६ दिवस बंद राहतील. यापैकी चार सुट्ट्या शनिवार किंवा रविवारी येत आहेत, जेव्हा बाजार आधीच बंद असतात. मार्च २०२६ मध्ये सर्वाधिक सुट्ट्या असतील. या महिन्यात ३ मार्च (होळी), २६ मार्च (श्रीराम नवमी) आणि ३१ मार्च (श्री महावीर जयंती) रोजी बाजार बंद राहतील. दुसरीकडे, फेब्रुवारी, जुलै आणि ऑगस्टमध्ये कोणतीही प्रभावी सुट्टी नसेल, कारण या महिन्यांतील अनेक राष्ट्रीय सुट्ट्या वीकेंडला येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande