हरिद्वारमध्ये मकर संक्रांतीसाठी भाविकांची अलोट गर्दी
हरिद्वार, 14 जानेवारी (हिं.स.) : माघ मकर संक्रांती स्नान पर्वाची सुरुवात दाट धुके आणि तीव्र थंडीच्या पार्श्वभूमीवर झाली. स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. ढोल आणि वाद्यांच्या गजरात देवाच्या पालख्यांना गंगेत स्नान घालण्यात आले. भाविक गंगेच्
हरिद्वार येथील गंगास्नानाचे छायाचित्र


हरिद्वार, 14 जानेवारी (हिं.स.) : माघ मकर संक्रांती स्नान पर्वाची सुरुवात दाट धुके आणि तीव्र थंडीच्या पार्श्वभूमीवर झाली. स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. ढोल आणि वाद्यांच्या गजरात देवाच्या पालख्यांना गंगेत स्नान घालण्यात आले. भाविक गंगेच्या हर की पैडी घाटावर एकत्र आलेत. प्रचंड थंडी असूनही भाविकांचा उत्साहात कायम होता. पहाटेपासून गंगेच्या सर्व घाटांवर भाविक स्नान, दान आणि पूजाअर्चा करताना दिसून आले. गंगा घाटावर आरतीही करण्यात आली.

सूर्याचे दक्षिणायनातून उत्तरायणात आगमन होणे आणि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते. यावर्षी संक्रांती आणि एकादशीचा शुभ योग असल्याने या विशेष मुहूर्तातील स्नान अत्यंत उत्तम असल्याचे ज्योतिष शास्त्राचेतज्ज्ञ सांगत आहेत. जाणकारांच्या मते आज बुधवार दुपारी 3 वाजून 7 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. उत्तरायण काळ शास्त्रांनुसार शुभ मानला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे आणि दान करणे विशेष फलदायी ठरते. या दिवशी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपासून रात्री 3 वाजून 4 मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग निर्माण होत आहे. यासोबतच चतुर्ग्रही योग आणि वृद्धी योगही राहणार असल्याने हा दिवस अधिकच शुभ ठरणार आहे. यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशीही येत आहे. असा योग सुमारे 23 वर्षांनंतर निर्माण होत असून, संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत पुण्यदायी आहे. या दिवशी केलेले स्नान, दान आणि पूजा अनंत पटीने शुभ फल देणारे मानले जाते.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande