भाजप खा. रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भीषण आग
नवी दिल्ली , 14 जानेवारी (हिं.स.)।दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात आज सकाळी भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्याची घटना समोर आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्या
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आग


नवी दिल्ली , 14 जानेवारी (हिं.स.)।दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात आज सकाळी भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्याची घटना समोर आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली. दिल्ली पोलिसांची फॉरेन्सिक टीमदेखील घटनास्थळी पोहोचली असून, आगीच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

अग्निशमन विभागाला सकाळी सुमारे ८:०५ वाजता मदर क्रेसेंट रोडवरील एका कोठी क्रमांकात आग लागल्याची सूचना मिळाली होती. माहिती मिळताच विभागाने तत्परता दाखवत तीन अग्निशमन वाहने तात्काळ घटनास्थळी रवाना केली. तेथे पोहोचल्यानंतर संबंधित निवासस्थान भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांचे असल्याचे स्पष्ट झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग पसरू नये यासाठी मोर्चा सांभाळत ती नियंत्रणात आणली. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ८:३५ वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

ही आग घरातील एका खोलीत ठेवलेल्या काही फर्निचरला लागल्याचे समोर आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आग लागली तेव्हा घरात उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दिल्ली पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत असून, आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात सब फायर ऑफिसर सुरेश एम यांनी सांगितले,“आम्हाला आग लागल्याची माहिती मिळाली होती. आम्ही आग विझवली आहे. आग एका खोलीत लागली होती. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. पथके तपास करत आहेत. कोणतेही नुकसान झालेले नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande