टी-२० विश्वचषक: पाकिस्तानी वंशाच्या चार अमेरिकन क्रिकेटपटूंना भारतीय व्हिसा नाकारला
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी अमेरिकन संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानी वंशाच्या चार क्रिकेटपटूंना भारतात प्रवास करण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही. यामुळे आता विश्वचषकात त्यांचा सहभाग धोक्यात आला आहे, असा दावा
टी-२० विश्वचषक लोगो


नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी अमेरिकन संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानी वंशाच्या चार क्रिकेटपटूंना भारतात प्रवास करण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही. यामुळे आता विश्वचषकात त्यांचा सहभाग धोक्यात आला आहे, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. २०२६ चा पुरुषांचा टी-२० विश्वचषक ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात होणार आहे. एका क्रिकेटपटूने सांगितले की त्याला आणि इतर तीन क्रिकेटपटूंना टी-२० विश्वचषकासाठी भारतात जाण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही.

वेगवान गोलंदाज अली खानने सांगितले की, हो, हे खरे आहे की तीन पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूंनाना भारतीय व्हिसा मिळालेला नाही, याचा अर्थ आम्ही टी-२० विश्वचषकात सहभागी होऊ शकणार नाही.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, टी-२० विश्वचषकासाठी २० सदस्यीय अमेरिकन संघात शायन जहांगीर, मोहम्मद मोहसीन आणि एहसान आदिल हे इतर तीन क्रिकेटपटू आहेत. तिघेही पाकिस्तानात जन्मले होते पण आता ते अमेरिकेचे नागरिक आहेत. भारताच्या व्हिसा नियमांनुसार, पाकिस्तानात जन्मलेल्या सर्व व्यक्तींना त्यांच्या जन्माच्या देशाच्या पासपोर्टचा वापर करून व्हिसासाठी अर्ज करावा लागतो.

या समस्येने यापूर्वीही पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूंना ग्रासले आहे. २०१९ मध्ये सिकंदर झुल्फिकार आणि साकिब झुल्फिकार यांना व्हिसा नाकारण्यात आला होता. २०२३ च्या विश्वचषकासाठी सिराज अहमदला उशिरा व्हिसा मिळाला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा (२०१७) आणि इंग्लंडचे फिरकीपटू रेहान अहमद आणि शोएब बशीर (२०२४) यांनाही अशाच समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande