बांगलादेश टी-२० विश्वचषक २०२६ चे सामने भारताबाहेर खेळवण्याच्या मागणीवर ठाम
ढाका, 13 जानेवारी (हिं.स.)बांगलादेश त्यांचे टी-२० विश्वचषक २०२६ चे सामने भारताबाहेर खेळवण्याच्या मागणीवर ठाम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्यातील बैठकीत बांगलादेशनेही आपली मागणी पुन्हा मांडली. बा
बांग्लादेश क्रिकेट बोर्ड लोगो


ढाका, 13 जानेवारी (हिं.स.)बांगलादेश त्यांचे टी-२० विश्वचषक २०२६ चे सामने भारताबाहेर खेळवण्याच्या मागणीवर ठाम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्यातील बैठकीत बांगलादेशनेही आपली मागणी पुन्हा मांडली. बांगलादेश बोर्डाने एक निवेदन जारी केले की, मंगळवारी दुपारी बीसीबी आणि आयसीसी यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये बांगलादेशच्या सहभागावर चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.

बीसीबीचे अध्यक्ष मोहम्मद अमिनुल इस्लाम, उपाध्यक्ष मोहम्मद शकवत हुसेन आणि फारूक अहमद, क्रिकेट ऑपरेशन्स कमिटीचे संचालक आणि अध्यक्ष नजमुल अबेदीन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी परिषदेला हजेरी लावली. सुरक्षेच्या कारणास्तव, बीसीबी भारतात प्रवास न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिला. बोर्डाने आयसीसीला भारताबाहेर इतरत्र बांगलादेशचे सामने आयोजित करण्याचा विचार करण्याची विनंती केली.

जरी आयसीसीने सांगितले की, स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे आणि बीसीबीला त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे, तरीही बोर्डाची भूमिका बदललेली नाही. दोन्ही पक्षांनी यावर सहमती दर्शवली की, संभाव्य तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरूच राहतील.

बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला सोडण्याचे निर्देश दिले, त्यानंतर बांगलादेशनेही त्यांचे क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेचे कारण देत भारतात टी-२० विश्वचषक २०२६ चे सामने खेळण्यास नकार दिला. बोर्डाने त्यांचे सामने भारताबाहेर खेळण्याची मागणी केली आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये, बांगलादेश त्यांचे चार गट सामने कोलकातामध्ये आणि एक मुंबईत खेळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande