
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेण्यास तयार आहे की ,नाही हे ठरवण्यासाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने निकोलस पूरनशी संपर्क साधला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजला २०२६ च्या टी-२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा आहे. पूरनने गेल्या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होतीय पण तो जगभरातील टी-२० फ्रँचायझी लीगमध्ये खेळत आहे.
सीडब्ल्यूआयचे क्रिकेट संचालक माइल्स बास्कोम्बे यांनी सांगितले की, बोर्डाने विश्वचषकासाठी सर्वोत्तम क्रिकेटपटू उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले, सर्वोत्तम क्रिकेटपटू वेस्ट इंडिजसाठी खेळावेत यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आम्ही पूरनशी बोललो आहोत.त्याला माहित होते की, विश्वचषक जवळ येत आहे आणि ते लक्षात घेऊन त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.
बास्कोम्ब पुढे म्हणाले की. पूरनने अलीकडेच सांगितले की तो त्याच्या निर्णयावर खूश आहे आणि तो त्यावर टिकून राहू इच्छितो. त्यामुळे, असे दिसते की त्याला आत्ता परतण्यात रस नाही.
वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड किंवा आंद्रे रसेल हे विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनात सामील होऊ शकतात का याचीही तपासणी सीडब्ल्यूआयने केली. पण बास्कोम्ब यांनी स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी कॅलेंडर इतके भरलेले आहेत की ते कठीण आहे.
ते पुढे म्हणाले, आम्ही क्रिकेटपटू पाठवले आहेत आणि उपलब्धतेसाठी विचारणा केली आहे. पण हे समजून घ्या की, विश्वचषकानंतर लगेचच आयपीएल सुरू होते. जो कोणी व्यवस्थापन संघात सामील होईल त्याला बराच वेळ घराबाहेर घालवावा लागेल. प्रथम विश्वचषक, नंतर आयपीएल. आम्हाला मिळालेल्या अभिप्रायानुसार हे शक्य दिसत नाही.
या महिन्याच्या अखेरीस अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर सीडब्ल्यूआय आता विश्वचषक संघाची घोषणा करण्यात येणार आहे. पूरन निवृत्तीच्या निर्णयावर राहण्यावर ठाम आहे आणि वरिष्ठ दिग्गज क्रिकेटपटू व्यवस्थापन भूमिकांसाठी उपलब्ध नाहीत, म्हणून बोर्ड विद्यमान क्रिकेटपटू आणि कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे