बीड - पुस्तकाचा गंध मस्तकात रुजल्याने माणूस घडतो : डॉ. लुलेकर
बीड, 15 जानेवारी (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला लाभल्यानंतर या विद्यापीठाचा दर्जा ज्ञानाने समृद्ध करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ज्ञानाची श्रीमंती वाढली, पुस्तकाचा गंध मस्तकात रुजला की माणूस घडतो, असे प्रतिप
बीड - पुस्तकाचा गंध मस्तकात रुजल्याने माणूस घडतो : डॉ. लुलेकर


बीड, 15 जानेवारी (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला लाभल्यानंतर या विद्यापीठाचा दर्जा ज्ञानाने समृद्ध करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ज्ञानाची श्रीमंती वाढली, पुस्तकाचा गंध मस्तकात रुजला की माणूस घडतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदा फाउंडेशन, बीडचे अध्यक्ष माप्राप्रदीप रोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शी बहुजनवादी स्पर्धा परीक्षा केंद्राचे अध्यक्ष प्रा. अशोक गायकवाड तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. लुलेकर मराठवाड्याचा ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक प्रवास उलगडून सांगताना नमूद केले की,

मराठवाडा हा दीर्घकाळ गुलामीत राहिलेला प्रदेश असून निजामशाहीच्या काळात शिक्षणाची मोठी पीछेहाट झाली. १९५८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतरच या भागात उच्च शिक्षणाची खरी सुरुवात झाली.

विद्यापीठाचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी शिक्षक, विद्यार्थी आणि समाजावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक विभागांमध्ये विद्यार्थी प्रवेश कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. लुलेकर म्हणाले की, शिक्षणाशिवाय समाजाच्या प्रगतीला कोणताही पर्याय नाही. केवळ पद्व्या नव्हे तर मुळातून ज्ञानसमृद्ध व्हावे आणि महाविद्यालये व विद्यापीठांत विद्यापीठांत शिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास वाघमारे यांनी केले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande