धुळ्यात मतदान यंत्राची तोडफोड; परिसरात तणावाचे वातावरण
धुळे, 15 जानेवारी, (हिं.स.) शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील एका मतदान केंद्रावर गोंधळाची घटना घडली असून मतदान प्रक्रियेला काही काळ अडथळा निर्माण झाला आहे. मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या खोली क्रमांक एक मधील मतदान यंत
धुळ्यात मतदान यंत्राची तोडफोड; परिसरात तणावाचे वातावरण


धुळे, 15 जानेवारी, (हिं.स.) शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील एका मतदान केंद्रावर गोंधळाची घटना घडली असून मतदान प्रक्रियेला काही काळ अडथळा निर्माण झाला आहे. मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक एक मध्ये घुसून शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व निवडणूक प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिेक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संबंधित मतदान केंद्रावरील मतदान काही काळासाठी थांबवण्यात आले होते. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande