जळगावात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३४.२७ टक्के मतदान
जळगाव , 15 जानेवारी (हिं.स.)जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील सर्व मतदान केंद्रांवर आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत शहरातील एकूण ३४.२७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या टक्केवारीत ७९,७२७
जळगावात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३४.२७ टक्के मतदान


जळगाव , 15 जानेवारी (हिं.स.)जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील सर्व मतदान केंद्रांवर आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत शहरातील एकूण ३४.२७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या टक्केवारीत ७९,७२७ पुरुष आणि ७०,५७२ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग कमी राहिला. या कालावधीत अवघे ५.५ टक्के मतदान नोंदवले गेले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ही टक्केवारी १३.३९ इतकी झाली. त्यानंतर दुपारपर्यंत मतदानाचा वेग थोडासा वाढलेला दिसून आला. सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या दोन तासांत तब्बल ३९,९४३ मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली. दुपारी १.३० वाजेपर्यंत शहरात एकूण २२.४९ टक्के मतदान झाले होते. या वेळेपर्यंत ९८,६४१ मतदारांनी मतदान केले असून त्यात ५४,१३२ पुरुष आणि ४४,५०९ महिलांचा समावेश आहे.थंडी कमी झाल्यानंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे आता सायंकाळी ३.३० ते ५.३० या शेवटच्या टप्प्यात मतदान किती वाढते, याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande