
बीड, 15 जानेवारी, (हिं.स.)। यंदा पावसाने सरासरी ओलांडल्याने मांजरा धरणासह तालुक्यातील लघु सिंचन प्रकल्प भरले होते. परिणामी, रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन उपसा करता येणार असून त्याचा पिकांना लाभ होणार आहे. शिवाय प्रकल्प अवलंबून असलेल्या २७ गावांच्या पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू असल्याने टंचाईचा प्रश्न ही सुटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जनसामान्यांना दिलासा मिळाला असून रब्बीचे उत्पन्न वाढीस मदत मिळणार आहे.
पावसाळ्याच्या पावसाने सुरुवातीच्या दोन महिन्यात पावसाने प्रतीक्षा करायला लावली होती. जून, जुलै हे दोन कोरडे गेल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून समाधानकारक पावसाला सुरुवात झाली. पुढे पावसाचा जोर वाढत गेल्याने दीड महिन्यात लहान मोठ्या प्रकल्पासह साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले. तर पावसाने सरासरी ओलांडल्याने सर्वत्र पाणी झाले. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फटका बसला.
केज तालुक्यातील प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा वाघेबाभूळगाव : ३.४८० दलघमी, मस्साजोग : १.११२ दलघमी, कारंजा : १.५०० दलघमी, होळ : ०.५११ दलघमी, मुलेगाव : ०.४८२८ कासारी : ०.४१९ दलघमी, नाव्होली : ०.३७२, जाधवजवळा : ३.७९० दलघमी, उंदरी: ४.१२० दलघमी, जिवाचीवाडी : १.३५० दलघमी, लिंबाचीवाडी क्र. १:१.१७० दलघमी, मुलेगाव: ०.४८२ दलघमी, जानेगाव: १.०२२ दलघमी, लिंबाचीवाडी क्र. २:१.०६० दलघमी तालुक्यात असलेल्या वाघेबाभुळगाव या मध्यम प्रकल्पासह मस्साजोग, जाधकजवळा, उंदरी, कारंजा, जानेगाव, मुलेगाव, नाव्होली, जिवाचीवाडी या लघु सिंचन प्रकल्प आणि लिंबाचीवाडीचे दोन साठवण तलावात भरपूर पाणी असल्याने ऊस पिकासह रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे. या प्रकल्पातून विद्युतमोटारीद्वारे सिंचन उपसा करता येत असल्याने पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी मदत मिळणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis