धायरी फाट्यावरील मतदान केंद्रावर शाई पुसण्याचा प्रयत्न
पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)। प्रभाग क्रमांक ३४ (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी ) मधील धायरी फाट्याजवळ असलेल्या नारायणराव सणस विद्यालयाच्या बाहेरील मतदान केंद्रावर मतदान झाल्यावर मतदाराला बोटाला लावण्यात येणारी मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या
धायरी फाट्यावरील मतदान केंद्रावर शाई पुसण्याचा प्रयत्न


पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।

प्रभाग क्रमांक ३४ (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी ) मधील धायरी फाट्याजवळ असलेल्या नारायणराव सणस विद्यालयाच्या बाहेरील मतदान केंद्रावर मतदान झाल्यावर मतदाराला बोटाला लावण्यात येणारी मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडले. तसच त्याला चोप दिला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

मतदान झाल्यावरती बोटाला शाई लावण्यात येते. ही शाई दोन ते तीन आठवडे जात नाही. मात्र, येथील मतदान केंद्रावर लिक्विडने शाई पुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून ते लिक्विड जप्त केले. तसेच याबाबत ते पोलिसाकडे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगेश पोकळे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande