सालेम बिन ब्रिक यांचा राजीनाम्यानंतर शाय्या मोहसिन जिंदानी यांची यमनच्या नव्या पंतप्रधानपदी नियुक्ती
सना, 16 जानेवारी (हिं.स.)।यमनमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. यमनचे पंतप्रधान सालेम बिन ब्रिक यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा सौदी अरेबिया समर्थित प्रेसिडेन्शियल लीडरशिप कौन्सिल (पीएलसी) यांनी स्वी
यमनच्या पंतप्रधान सालेम बिन ब्रिक यांचा राजीनामा ; परराष्ट्रमंत्री शाय्या मोहसिन जिंदानी नव्या पंतप्रधानपदी


सना, 16 जानेवारी (हिं.स.)।यमनमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. यमनचे पंतप्रधान सालेम बिन ब्रिक यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा सौदी अरेबिया समर्थित प्रेसिडेन्शियल लीडरशिप कौन्सिल (पीएलसी) यांनी स्वीकारला आहे. यमनमध्ये सुरू असलेल्या राजकीय आणि सुरक्षाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर सालेम यांनी औपचारिकरित्या राजीनामा सादर केला होता, जो मंजूर करण्यात आला. सालेम यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच नव्या पंतप्रधानांची नियुक्ती करण्यात आली आहे. यमनचे परराष्ट्र मंत्री शाय्या मोहसिन जिंदानी यांची देशाच्या नव्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गुरुवारी राज्य वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सालेम यांच्या राजीनाम्यानंतर जिंदानी यांना पुढील मंत्रिमंडळ स्थापनेसाठी नामनिर्देशित करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांत यमनमध्ये सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात वाढलेल्या तणावामुळेच हा राजीनामा दिला गेल्याचे सांगितले जात आहे.

संयुक्त अरब अमिराती समर्थित फुटीरतावादी संघटना ‘दक्षिणी संक्रमणकालीन परिषद’ यांनी डिसेंबर महिन्यात दक्षिण आणि पूर्व यमनमधील अनेक भागांवर ताबा मिळवला होता आणि सौदी अरेबियाच्या सीमेपर्यंत मजल मारली होती. सौदी अरेबियाने याला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानले होते. मात्र, नंतर सौदी समर्थित लढवय्यांनी मोठ्या प्रमाणावर या भागांमधून त्यांना मागे हटवले.

उल्लेखनीय म्हणजे, भू-राजकारणापासून ते तेल उत्पादनापर्यंत अनेक मुद्द्यांवर सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात तीव्र मतभेद राहिले आहेत, ज्यामुळे दोन्ही आखाती शक्तींमधील तणाव वाढला आहे. याआधी यमनच्या गृहयुद्धात इराण समर्थित हूथींविरोधात लढणाऱ्या आघाडीत सौदी अरेबिया आणि यूएई यांनी एकत्र काम केले होते. त्या संघर्षामुळे यमनमध्ये अत्यंत गंभीर मानवीय संकट निर्माण झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande