
बीड, 17 जानेवारी, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी रुग्णालयांना भेट देऊन नागरिकांच्या स्वास्थ्याची विचारपूस केली.
आष्टी तालुक्यातील कडा गावचे रहिवासी, राहुरी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. हरिभाऊ मार्कंडे, मागील काही आठवड्यांपासून अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्याची भेट घेऊन आरोग्यविषयक चौकशी केली व काळजी घेण्याची विनंती केली.
धनवडे वस्ती, मुर्शदपूर येथील 16 वर्षीय मुलगा शिवबा संदीप चव्हाण याची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली असून, आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
मॅक केअर हॉस्पिटल, मौजे पिंपळा येथे माझे मित्र श्री. विष्णू लोखंडे यांची अँजिओग्राफी शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयात भेट देऊन त्यांची आरोग्यविषयक स्नेहपूर्ण चौकशी केली.
या भेटीच्या दरम्यान, सर्व डॉक्टर मंडळींशी रुग्णांच्या शस्त्रक्रिया व निदानांसंबंधी चौकशी करून योग्य उपचार व सहकार्य करण्याची नम्र विनंती केली.
याप्रसंगी डॉ.गांगर्डे सर, डॉ.चेडे सर, डॉ.देशमुख साहेब, डॉ.सांबरे सर, डॉ.चौधरी सर, डॉ.अधिक सर आणि डॉ.मगर सर हे उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis