आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार !
महापौर पदावर भाजपचा दावा , उपमहापौर शिंदे गटाकडे जाणार जळगाव , 17 जानेवारी (हिं.स.) जळगाव महापालिकेत महायुतीने ७५ पैकी ६९ जागा जिंकून एकतर्फी बहुमत मिळवले आहे. विशेष भाजपने ४६ पैकी ४६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे
जळगाव महापालिका


महापौर पदावर भाजपचा दावा , उपमहापौर शिंदे गटाकडे जाणार

जळगाव , 17 जानेवारी (हिं.स.) जळगाव महापालिकेत महायुतीने ७५ पैकी ६९ जागा जिंकून एकतर्फी बहुमत मिळवले आहे. विशेष भाजपने ४६ पैकी ४६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर विजय मिळवत दुसरा मोठा पक्ष ठरला. निकालानंतर आता शहराच्या राजकारणाचे लक्ष महापौरपदाकडे लागले आहे. महायुतीकडे बहुमताच्या दृष्टीने आघाडी असल्याने जळगावचा पुढील महापौर कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.मात्र अद्यापही महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले नाही. आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे. त्याआधीच जळगाव महापालिकेत महायुतीकडून रणनीती आखली जात असल्याचे समोर आले आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे असल्याने महापौरपदावर भाजपने ठाम दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला असून, महापौरपदासाठी अनुभवी व संघटनात्मक पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकाचे नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.दुसरीकडे महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाला उपमहापौर पद मिळणार असल्याचं जवळपास स्पष्ट झाले आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केवळ एक जागा जिंकली असून यामुळे अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकालाही स्थायी समितीवर किंवा विषय समितीवर घेतले जाऊ शकते. दरम्यान, महापौर पदावर भाजपचा दावा निश्चित मानला जात असून, उपमहापौर पद शिंदे गटाकडे जाणार, हे जवळपास ठरलेले आहे. मात्र, दोन्ही पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेतृत्व निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर, इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकापेक्षा अधिक नगरसेवकांना टप्याटप्याने संधी देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande