मुख्यमंत्री फडणवीस यांची आ. राठोड यांनी भेट घेऊन केले अभिनंदन
नांदेड, 17 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे खरे शिल्पकार आणि नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे मुखेड विधा
Q


नांदेड, 17 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे खरे शिल्पकार आणि नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे मुखेड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार तुषार राठोड यांनी प्रत्यक्षात भेट घेतली.

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्याविजयासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनस्वी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..! यावेळी बिलोली शहराचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी उपस्थित होते.

महाराष्ट्रात 29 महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि त्यांचे निकालही जाहीर झाले. नांदेड सह अनेक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे अभिनंदन त्यांनी केले आहे

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande