
अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)।
अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी चे निलेश देव,पराग गवई, उज्वला प्रविण पातोडे, शेख शमशू शेख साबीर, जयश्री महेंद्र बहादुरकर हे विजयी झाले.
विजयी झालेल्या या नव नियुक्त नगरसेवकाचा सत्कार वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोल्यातील पक्ष कार्यालय टावर चौक येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून नैतिकउद्दीन खतीब होते तर प्रमुख उपस्थितीत राजेंद्र पातोडे उपस्थित होते तर यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे, आम्रपाली खंडारे, धीरज इंगळे, मजहर खान, गजानन गवई, मनोहर बनसोड, सुनील मानकर, सुनील फाटकर शोभा शेळके, गोरसिंग राठोड, पवन बुटे, किशोर जामनिक, मंगला शिरसाट, लक्ष्मी वानखडे, अर्चना डाबेराव, नितीन सपकाळ,
शंकर इंगोले, रामा तायडे, पुरुषोत्तम वानखडे, निलेश वाहुरवाघ, विकास सदांशिव, सतीश चोपडे, संतोष कीर्तक, सुयोग आठवले, उमेश देवतडे, वासिफ खान, अन्सार भाई, देवानंद अंभोरे, प्रदीप शिरसाट, गजानन दांडगे,उमा अंभोरे, हर्षल लोखंडे, आतिश शिरसाट,गोपाल ढोरे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्व नवनियुक्त नगरसेवक यांनी सत्काराला उत्तर देताना ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही दिवस रात्र अकोला शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू असे मनोगत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे