
पुणे, 17 जानेवारी (हिं.स.)देशाची आर्थिक राजधानी मुंबई सह राज्यातील बहुतांश महानगर पालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांनी सत्तेच्या चाव्या भाजप च्या हाती दिल्या आहेत. भाजप चे हे अभूतपूर्व यश म्हणजे 'देवाभाऊंच्या' नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेल्या निर्विवाद विश्वासाची पोहोच पावती आहे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.
राज्यातील बहुतांश महानगर पालिकांमध्ये भाजप ची सरशी झाली आहे. आता राज्यातील बऱ्याच शहरांमध्ये मोदी-फडणवीस-आणि भाजप महापौरांचे ट्रिपल इंजिन चे सरकार काम करणार असल्याने विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी पक्षाचे झालेले पानिपत लक्षात घेता काँग्रेसला पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु