हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची भेट
नांदेड, 17 जानेवारी, (हिं.स.)। “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्व
हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची भेट


नांदेड, 17 जानेवारी, (हिं.स.)। “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर नियोजन करण्यात आले असून, त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली.

यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती देत चर्चा केली. तसेच कार्यक्रमाच्या विविध बाबींवर समन्वय व व्यवस्थापनाबाबत विचारविनिमय करण्यात आला. हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनीही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी “अविरत महसूल” या पुस्तिकेची प्रत भेट देऊन राहुल गुप्ता यांचे स्वागत केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, कार्यकारी अधिकारी तथा हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमाचे शासकीय समन्वयक जगदीश सकवान, तहसीलदार आनंद देऊळगावकर आदी अधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande