पुणे जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना अंतराळ भरारीची संधी
पुणे, 17 जानेवारी (हिं.स.)पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षीही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता ६ वी व ७ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदे कडून अमेरिकेतील नासा व भारतातील इसरो येथे अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार आहे. यासाठी आयुका सं
ZP pune


पुणे, 17 जानेवारी (हिं.स.)पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षीही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता ६ वी व ७ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदे कडून अमेरिकेतील नासा व भारतातील इसरो येथे अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार आहे.

यासाठी आयुका संस्थेच्या मार्फत निवड चाचणी होणार असून, या चाचणीतून अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. पहिली चाचणी जून 2026 पासून सुरू होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची गोडी लागावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande