
लातूर, 17 जानेवारी (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या मतांची मतमोजणी काल संपन्न झाली. एकूण ७० नगरसेवक निवडून आले. यापैकी सर्वाधीक १५ नगरसेवक हे मुस्लीम समाजाचे आले आहेत.
या लातूर शहरात अठरा पगड जातीचे नागरिक राहतात. पालिकेच्या निवडणुका बहुरंगी, बहुचर्चित अशा झाल्या. प्रत्येक समाजाला आपल्यातून एखादा नगरसेवक असावा अशी भावना असते. विविध राजकीय पक्षांनी सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन विविध समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला हे खरे असले
तरी त्या-त्या प्रभागात कोणत्या समाजाची मते अधिक आहेत हे उमेदवारी देत असताना राजकीय पक्षांनी खबरदारी घेतल्याचे दिसून आले.
लातूर महापालिकेत एकूण ७० नगरसेवक आहेत. काल मतमोजणी नंतर सर्वाधीक नगरसेवक हे मुस्लीम समाजाचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्याखालोखाल १२ नगरसेवक हे बौद्ध समाजाचे निवडून आले आहेत. त्यानंतर मराठा समाजाचे ११, लिंगायत समाजाचे ८, यलम समाजाचे ७, धनगर समाजाचे ६, मातंग, धोबी, कोळी समाजाचे प्रत्येकी २ तर अग्रवाल, भावसार, वडार, ब्राम्हण, मारवाडी समाजातील प्रत्येकी एक नगरसेवकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. शहरात अनेक समाजाचे नागरिक राहतात, पण बहुतेकांना या निवडणुकीत संधी मिळाली नाही किंवा ते निवडून येऊ शकले नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis