रत्नागिरी : जि. परिषद, पं. समिती निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी महायुत
रत्नागिरी : जि. परिषद, पं. समिती निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर


रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली.

यावेळी त्यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत, महायुती सर्व ५६ जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शिक्कामोर्तब केलेली नावे अशी -

जिल्हा परिषद -

खेडशी - सौ. हर्षदा भिकाजी गावडे

मुचरी - माधवीताई गीते

कसबा - रचनाताई महाडिक

झाडगाव - सौ. श्रद्धा दीपक मोरे

पावस - महेंद्र मांडवकर

खालगाव - महेश म्हाप

गोळप - नंदकुमार मुरकर

वेळणेश्वर - नेत्रा ठाकूर

पडवे - महेश नाटेकर

पंचायत समिती

हातखंबा - विद्याविलास भोंगले

देवूड - नेहा गावणकर

नाणीज - डॉ. पद्मजा संजय कांबळे

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande