रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे स्त्रीभ्रूणहत्येविषयी जनजागृती
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संकल्पनेतून आणि रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे संगमेश्वर येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्त्रीभ्रूणहत्या, त्याचे दुष्परिणाम आणि कायदेशीर तरतुदी या विषयावर व
रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे स्त्रीभ्रूणहत्येविषयी जनजागृती


रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संकल्पनेतून आणि रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे संगमेश्वर येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्त्रीभ्रूणहत्या, त्याचे दुष्परिणाम आणि कायदेशीर तरतुदी या विषयावर विशेष जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात 'बेटी बचाव बेटी पढाव' आणि 'घर घर में न्याय' यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

प्रमुख मार्गदर्शक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी स्त्रीभ्रूण हत्येच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, स्त्रीभ्रूणहत्या हा केवळ एक सामाजिक गुन्हा नसून, मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. यासाठी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितेल. त्यांनी महिलांचे हक्क, त्यांना मिळणारे कायदेशीर संरक्षण आणि मोफत कायदेशीर मदत याबद्दल सविस्तर माहिती दिली.

​पॅनल विधिज्ञ ॲड. अमित शिरगावकर यांनी यावेळी स्त्रीभ्रूण हत्येस प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या विविध कलमांची माहिती देऊन, या गुन्ह्याचे समाजावर होणारे परिणाम आणि ते रोखण्यासाठी नागरिकांची जबाबदारी यावर भाष्य केले. या कार्यक्रमात 'घर घर में न्याय' या उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांपर्यंत न्याय पोहोचवण्याच्या संकल्पनेवरही विशेष भर देण्यात आला.

यावेळी व्यापारी पैसा फंड सोसायटीचे सचिव धनंजय शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंब्रे, शाळेचे मुख्याध्यापक सचिन खामकर आणि पर्यवेक्षक प्रकाश दळवी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande