
रायगड, 17 जानेवारी, (हिं.स.)। वीर सावरकर वाचनालय आयोजित काव्यवाचन स्पर्धा पाली येथे उत्साहात संपन्न झाली. सदर स्पर्धेला श्री. मंगेश झरेकर, श्री. सुंदर हिरवे, सौ. शुभदा सावंत देसाई, कवी श्री. विराज चव्हाण हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच काव्यवाचन स्पर्धेसाठी श्री. प्रदीप मोरे व सौ. प्रिया मांडवकर हे साहित्य क्षेत्रातील तज्ञ परीक्षक म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीस समर्थ जाधव याने वीर सावरकर यांची कविता सादर केली. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. वैभव देसाई यांनी केले. सदर स्पर्धेला श्री. सदानंद पवार, श्री. सुरज वेल्हाळ, श्री. सिद्धेश दूरकर, श्री. शुभम नार्वेकर, यांचे मोलाचे योगदान लाभले.
काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नितीश खानविलकर द्वितीय क्रमांक कांचना खोचाडे तृतीय क्रमांक पूर्वा आगाशे उत्तेजनार्थ अमोल यादव, राहुल सावंत, अजय चव्हाण, अथर्व पाध्ये, आकांक्षा जाधव, गणराज काजरेकर, ओमकार सागवेकर.
निबंध स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
१)पाचवी ते सातवी गटामध्ये
प्रथम क्रमांक शामल श्रीकांत लवटे द्वितीय क्रमांक शार्वि सुदर्शन धनावडे तृतीय क्रमांक ईश्वरी संदेश माईन
२)सातवी ते आठवी गटांमध्ये प्रथम क्रमांक सृष्टी प्रवीण रजपूत द्वितीय क्रमांक देवयानी अनिल नागले तृतीय क्रमांक रिया गंगाराम मोटर
३)नववी ते दहावी गटामध्ये प्रथम क्रमांक शर्वरी प्रमोद तेरेकर द्वितीय क्रमांक तन्मय हेमंत मोघे व तृतीय क्रमांक तन्वी राजेंद्र माईन.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर