
नवी दिल्ली, २० जानेवारी (हिं.स.) टाटा महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जी. कमलिनी दुखापतीमुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडली आहे. मुंबई इंडियन्सने तिच्या जागी वैष्णवी शर्माची निवड केली आहे.जी. कमलिनीने चालू टाटा WPL 2026 हंगामात मुंबई इंडियन्ससाठी पाच सामने खेळले होती. पण दुखापतीमुळे ती आता संपूर्ण हंगामात सहभागी होऊ शकणार नाही.
मुंबई इंडियन्सने डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माला कमलिनीच्या जागी ३० लाख रुपयांना त्यांच्या संघात समावेश केला आहे. वैष्णवी २०२५ मध्ये विजेतेपद जिंकणाऱ्या भारताच्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक संघाचा भाग होती.
वैष्णवी शर्माने आतापर्यंत भारतासाठी पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि पाच विकेट्स घेतल्या आहेत. या तरुण फिरकी गोलंदाजाच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आक्रमणाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे. मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाला विश्वास आहे की वैष्णवी तिच्या कामगिरीने संघाच्या गरजा पूर्ण करेल आणि स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे