महिला प्रीमियर लीग : आरसीबी सलग पाचव्या विजयासह प्लेऑफमध्ये
वडोदरा, 20 जानेवारी (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने गुजरात जायंट्सचा ६१ धावांनी पराभव केला. महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आरसीबीचा हा सलग पाचवा विजय आहे. यासह, स्मृती मानधनाचा संघ अव्वल स्थानावर राहून प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. वडोदरा येथ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ


वडोदरा, 20 जानेवारी (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने गुजरात जायंट्सचा ६१ धावांनी पराभव केला. महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आरसीबीचा हा सलग पाचवा विजय आहे. यासह, स्मृती मानधनाचा संघ अव्वल स्थानावर राहून प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आरसीबीने २० षटकांत सहा बाद १७८ धावा केल्या. पया आव्हानाचा पाठला करताना गुजरातला निर्धारित षटकांत केवळ ११७ धावा करता आल्या.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली होती. ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वॉल यांना फक्त नऊ धावांवर बाद केले. त्यानंतर गौतमी नाईकने शानदार अर्धशतक झळकावत डाव सावरला. तिने कर्णधार स्मृती मानधनासह तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मानधनाच्या बाद झाल्यानंतर नाईकने रिचा घोषसह चौथ्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. नाईकने ५५ चेंडूत ७३ धावांची शानदार खेळी केली, तर रिचा घोषने आक्रमक २७ धावा केल्या. शेवटी, राधा यादवच्या धमाकेदार खेळीमुळे आरसीबीने २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या.

१७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्स सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसले. त्यांनी पॉवरप्लेमध्येच बेथ मूनी, सोफी डेव्हिन, अनुष्का शर्मा आणि कनिका आहुजा सारख्या महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. सुरुवातीच्या अपयशातून संघ सावरू शकला नाही. कर्णधार अ‍ॅशले गार्डनरने ४३ चेंडूत ५४ धावांची लढाऊ खेळी केली आणि भारती फुलमाळीने काही आधार दिला. पण धावगतीवरील दबाव वाढतच गेला. आरसीबीच्या गोलंदाजीसमोर गुजरातची फलंदाजी कोसळली आणि संघ २० षटकांत ८ बाद ११७ धावाच करू शकला आणि संघाला ६१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande