अ‍ॅशेस : सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ ४५ षटकांचा खेळ; इंग्लंड दिवसअखेर २११/३
सिडनी, ४ जानेवारी (हिं.स.). सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) येथे झालेल्या शेवटच्या अ‍ॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस आणि खराब प्रकाशाचा परिणाम झाला. पण असे असूनही, जो रूट आणि हॅरी ब्रुक यांच्यातील नाबाद भागीदारीने इंग्लंडचा डाव सावरला. दिवसाच्या
जो रुट आणि हॅरी ब्रूक


सिडनी, ४ जानेवारी (हिं.स.). सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) येथे झालेल्या शेवटच्या अ‍ॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस आणि खराब प्रकाशाचा परिणाम झाला. पण असे असूनही, जो रूट आणि हॅरी ब्रुक यांच्यातील नाबाद भागीदारीने इंग्लंडचा डाव सावरला. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने ३ बाद २११ धावांपर्यंत मजल मारता आली.

पावसामुळे प्रभावित झालेल्या दिवशी फक्त ४५ षटकांचा खेळ शक्य झाला. इंग्लंडची सुरुवात डळमळीत झाली. त्यांनी ५७ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी चौथ्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या संघचा डाव सावरण्यात यश मिळवलं.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडने लंचपर्यंत ३ बाद ११४ धावा केल्या. बेन डकेटने पहिल्या अर्ध्या तासात मिशेल स्टार्कविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आणि पाच चौकार मारले. पण स्टार्कने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्यास भाग पाडले आणि त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले.

ड्रिंक्स ब्रेकच्या सुमारास इंग्लंडचे फंलदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करु शकले नाही. यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी संयमाने फलंदाजी करत डाव स्थिर केला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून काहीशी मदत मिळाली. पण सातत्यपूर्ण लाईन आणि लेंथ राखण्यात ते अपयशी ठरले. आणि जो रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले, तर हॅरी ब्रूकने आक्रमक शॉट्ससह अर्धशतकही झळकावले.

ऑस्ट्रेलियाने गोलंदाज बदलले आणि शॉर्ट-बॉलची रणनीती स्वीकारली. पण मिशेल स्टार्क वगळता कोणताही गोलंदाज सातत्याने दबाव राखू शकला नाही. दिवसाच्या अखेरीस ढग जमले, प्रकाश आणखी खराब झाला आणि पाऊस सुरू झाला. पंचांनी लाईट मीटरचा वापर केला आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे खेळ थांबवण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande