आयएसएलच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर करणार : एआयएफएफ
नवी दिल्ली, 04 जानेवारी (हिं.स.)अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) सांगितले आहे की, इंडियन सुपर लीग (ISL) च्या २०२५-२६ हंगामाची सुरुवातीची तारीख पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समन्वय समितीचा अ
इंडियन सुपर लीग ट्रॉफी संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 04 जानेवारी (हिं.स.)अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) सांगितले आहे की, इंडियन सुपर लीग (ISL) च्या २०२५-२६ हंगामाची सुरुवातीची तारीख पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समन्वय समितीचा अहवाल सादर केल्यानंतर ही घोषणा केल जाणार आहे.

आपत्कालीन समितीच्या बैठकीनंतर, AIFF ने सांगितले की ही टॉप-टीअर लीग आयोजित केली जाईल. जरी क्लबांनी यापूर्वी काही मुद्दे उपस्थित केले होते. असेही कळले आहे की, AIFF १५ फेब्रुवारी रोजी ISL सुरू करण्याचा प्रस्ताव देऊ शकते. २०२५-२६ हंगामात विलंब हा माजी व्यावसायिक हक्कधारक FSDL सोबतच्या मास्टर राइट्स करार (MRA) ची मुदत ८ डिसेंबर रोजी संपल्यामुळे झाला होता.

AIFF ने एका निवेदनात म्हटले आहे की, AIFF-ISL समन्वय समितीने सादर केलेल्या अहवालावर AIFF आपत्कालीन समितीने विचार केला आणि त्याची दखल घेतली. समन्वय समितीला २ जानेवारी २०२५ पर्यंत एआयएफएफ सचिवालयाला आपला अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात आली होती. ज्याचे रीतसर पालन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande