जो गोंधळ झाला त्याला मी जबाबदार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची दिलगिरी
* नाशिक मनपा निवडणुकीसाठी भाजपने फोडला प्रचाराचा नारळ नाशिक, 04 जानेवारी (हिं.स.)। नाशिकमध्ये जो काही गोंधळ एबी फॉर्म वाटताना झाला त्याला मी जबाबदार आहे. हे सर्व मी केलं असं समजा सर्व नेत्यांनी एकत्र होऊन पार्टी विजयी करण्यासाठी एकत्र लढू आणि विज
मनपा निवडणुकीसाठी भाजपने


* नाशिक मनपा निवडणुकीसाठी भाजपने फोडला प्रचाराचा नारळ

नाशिक, 04 जानेवारी (हिं.स.)। नाशिकमध्ये जो काही गोंधळ एबी फॉर्म वाटताना झाला त्याला मी जबाबदार आहे. हे सर्व मी केलं असं समजा सर्व नेत्यांनी एकत्र होऊन पार्टी विजयी करण्यासाठी एकत्र लढू आणि विजयी करू अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फॉर्म गोंधळा प्रकरणी दिलगिरी व्यक्त करताना सांगितले की, महानगरपालिकांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना आपले कार्य समजून सांगावे असे आवाहन केले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून रविवारी नासिक मध्ये श्रद्धा लॉन्स या ठिकाणी विजय संकल्प मेळावा आयोजित केलेला होता. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ देखील केला आहे.

या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नाशिक मधील प्रमुख नेते गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे , आमदार सीमा हिरे ,आमदार राहुल ढिकले, अपूर्व हिरे ,सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे , यतीन वाघ, राहुल कुलकर्णी, नाना शिलेदार, पवन भगूरकर, गोविंद बोरसे, यांच्यासह पक्षाचे उमेदवार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्याला संबोधित करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावरती पक्षाकडे उमेदवारांची मागणी होती परंतु जागा फक्त 122 होता निवड करणे अतिशय अवघड होते त्यामुळे आम्ही या ठिकाणी निवड करताना काही निकष लावले आणि त्या निकषाच्या आधारावर तीच उमेदवारी दिली आहे अनेक जण नाराज झाले पण आमच्यासमोर ही काही पर्याय नव्हता आता सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. महाजन यांच्याआधी आमदार सीमा हिरे आणि आमदार राहुल ढिकले यांनी या निर्धार मेळाव्याला संबोधित केले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक मध्ये झालेल्या सर्व गोंधळावरती भाष्य केले ते म्हणाले की नाशिक मध्ये झालेला हा सर्व प्रकारचे अवलोकन केले जात आहे. ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर पार्टी कारवाई करणार आहे निवडणूक काळ कमी आहे म्हणून सध्या काही निर्णय घेणे योग्य नाही सध्या जे काही घडले आहे याचे दडपण सर्वांनाच आहे पण त्यावर आज पडतात टाकला तर ते योग्य राहील त्यामुळे त्यावर सर्व मीच केले असे समजून पक्षातील जुने नवे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन काम करावे असे सांगत त्यांनीच घडल्या प्रकारावरती आपली नाराजी व्यक्त करतानाच दिलगिरी देखील व्यक्त केली.

मार्गदर्शन करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, निवडणूक जिंकायची आहे नाशिककरांचे स्वप्न पूर्ण करायचा आहे नाशिककरांना आज ज्या अडचणी येत आहेत त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत यात कोणतेही शंका नाही . मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस देशांमध्ये नरेंद्र मोदी यांनी जी विकास कार्य केलेली आहे जी समाज उपयोगी कार्य केलेली आहे त्याबाबतची माहिती द्या त्यांच्याकडून शहराचा विकास व्हावा त्यांच्या अडचणी कमी व्हावा यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे याबाबतची संकल्पना त्यांना समजून सांगा. मतदारांचे एक मत हे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना जाणार आहे याची आठवण त्यांना करून द्या म्हणजेच विकासाचा मार्ग मोकळा होईल हे देखील समजून सांगा असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे सर्व करत असताना ज्या भागामध्ये आपले आमदार आहेत त्या भागातील आमदारांनी बुथ स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करा त्यांना अधिक बळकट करा त्यांना पाहिजे ची सामुग्री उपलब्ध करून द्या त्यांच्याकडे आवश्यक ते लक्ष द्या असे आमदारांना सांगितले ज्या ठिकाणी पक्षाचे आमदार नाही त्या ठिकाणी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घालावे आणि बुथ यंत्रणा सक्षम करावी असे आदेशही देताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी किमान दहा तास तरी काम करून घराघरापर्यंत आपले विचारधारा पोचवली पाहिजे म्हणजे येणारा महापौर हा तुमच्या ताकदीने निवडून येईल तुमच्या प्रभागातील नगरसेवक निवडून येतील आणि शहराचा विकास होईल हे लक्षात ठेवा त्यामुळे आपला एकच निर्णय आहे मतदान हे कमळालाच झाले पाहिजे याकडे कल असला पाहिजे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande