ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील 641 उमेदवारांना चिन्हांचे वाटप
ठाणे, 04 जानेवारी (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी नामनिर्देशन अर्ज छाननी व माघार प्रक्रियेनंतर आज चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 641 उमेदवारांना ‍चिन्ह वाटप करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा ‍ निवडणूक
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील 641 उमेदवारांना चिन्हांचे वाटप


ठाणे, 04 जानेवारी (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी नामनिर्देशन अर्ज छाननी व माघार प्रक्रियेनंतर आज चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 641 उमेदवारांना ‍चिन्ह वाटप करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा ‍ निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत 23 डिसेंबर पासून नामनिर्देशनपत्र वाटप, नामनिर्देशनपत्रे दाखल करुन घेणे, छाननी व नामनिर्देशन पत्र माघार घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. अशा उमेदवारांची संख्या 641 इतकी असून सहा उमेदवार एकटेच संबंधित जागेसाठी शिल्लक राहिले आहेत. या उमेदवारांच्या संदर्भात उचित अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहेत. तसेच सर्व 641 लढविणाऱ्या उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

*प्रभागसमितीनिहाय निवडणूकीच्या रिंगणात असलेले अंतिम उमेदवार*

प्रभाग समिती एकूण उमेदवार

माजिवडा मानपाडा प्रभाग समिती - 92

वर्तकनगर प्रभाग समिती - 64

लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती - 85

वागळे प्रभाग समिती - 35

नौपाडा कोपरी प्रभाग समिती - 52

उथळसर प्रभाग समिती - 50

कळवा प्रभाग समिती - 82

मुंब्रा प्रभाग समिती 26-31 - 39

मुंब्रा प्रभाग समिती 30-32 - 49

दिवा प्रभाग समिती 27-28 - 42

दिवा प्रभाग समिती 29-33 - 51

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande