गुरमीत राम रहीमला ४० दिवसांचा पॅरोल मंजूर, १५ व्यांदा होणार तुरुंगातून सुटका
हरियाणा, 04 जानेवारी (हिं.स.)बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर तुरुंगात असलेल्या गुरमीत राम रहीमला आणखी ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्याला सुनारिया जिल्हा कारागृहातून डेरा सच्चा सौदा सिरसा येथे ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
गुरमीत राम रहीम


हरियाणा, 04 जानेवारी (हिं.स.)बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर तुरुंगात असलेल्या गुरमीत राम रहीमला आणखी ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्याला सुनारिया जिल्हा कारागृहातून डेरा सच्चा सौदा सिरसा येथे ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. राम रहीम लवकरच रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून बाहेर पडून सिरसा येथील डेरा सच्चा सौदा येथे जाणार आहे. गेल्या आठ वर्षांत बाबा राम रहीमची तुरुंगातून सुटका होण्याची ही १५ वी वेळ आहे आणि २०२६ मध्ये ते पहिल्यांदाच तुरुंंगाबाहेर येणार आहेत.

डेरा सच्चा सौदाचे दुसरे गुरु शाह सतनाम जी यांच्या जन्म महिन्यानिमित्त त्यांना पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. बाबा राम रहीम सिरसा येथे येण्याआधी तयारी सुरू झाली आहे आणि डेरा सच्चा सौदा येथे हालचाली सुरू आहेत. राम रहीमला वारंवार पॅरोल मंजूर केल्याने राजकारणही तापले आहे. या वर्षी त्याची ही चौथी सुटका आहे आणि २०१७ मध्ये त्याला शिक्षा झाल्यानंतरची त्याची १५ वी सुटका आहे. मागील पॅरोल कालावधी ४० दिवसांचा होता. यावेळी, तेवढेच दिवस मंजूर करण्यात आले आहेत.

यापूर्वी, राम रहीमला एप्रिलमध्ये २१ दिवसांचा आणि जानेवारीमध्ये ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २०१७ मध्ये बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राम रहीम पुन्हा सुटणार आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये, दोन महिला अनुयायांवर बलात्कर प्ररकरणी राम रहीम यांना २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेमुळे पंचकुला आणि सिरसा येथे भयानक हिंसाचार झाला होता. ज्यामध्ये सुमारे ४० नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये, पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने पत्रकार रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण राम रहीम यांच्या पॅरोलवर सतत आक्षेप घेतले जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande