
नवी दिल्ली, 04 जानेवारी (हिं.स.)सात वेळा ग्रँडस्लॅम टेनिस चॅम्पियन व्हीनस विल्यम्स जानेवारी २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुनरागमन करणार आहे. १८ जानेवारीपासून मेलबर्न येथे सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये तिला वाइल्डकार्ड एन्ट्री मिळाली. पाच वर्षांत व्हीनसची ही या स्पर्धेत पहिलीच उपस्थिती असेल आणि तिच्या लग्नाच्या काही दिवसांनीच ती टेनिस कोर्टवर परत येत आहे.
४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला टेनिसपचू ठरणार आहे. तिने जपानच्या किमिको डेटचा विक्रम मोडित काढला आहे. २०१५ मध्ये ४४ व्या वर्षी ती मेलबर्न पार्क येथे खेळली होती. मी ऑस्ट्रेलियात परतण्यास उत्सुक आहे. माझ्या तिथे अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत आणि या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे, व्हीनस म्हणाली.
स्पर्धेच्या आयोजकांनी पुष्टी केली की, व्हीनसचे पुनरागमन तिच्या ऑस्ट्रेलियन ओपन पदार्पणानंतर २८ वर्षांनी झाले आहे. १९९८ मध्ये, तिने तिची धाकटी बहीण सेरेनाला दुसऱ्या फेरीत पराभूत केले होते. पण उपांत्यपूर्व फेरीत तिला अमेरिकन लिंडसे डेव्हनपोर्टकडून पराभव होतास्वीकारावा लागला. व्हीनसने ऑस्ट्रेलियन ओपन एकेरीच्या अंतिम फेरीत दोनदा प्रवेश केला आहे. २००३ मध्ये सेरेना विरुद्ध आणि पुन्हा २०१७ मध्ये. तिचा आतापर्यंतचा विक्रम ५४ विजय आणि २१ पराभवांचा आहे. हा तिचा २२ वा मुख्य ड्रॉ खेळ असेल. ती शेवटची २०२१ मध्ये मेलबर्नमध्ये खेळली होती, त्यानंतर तिने नियमित दौऱ्यातून ब्रेक घेतला होता.
व्हीनसने नोव्हेंबरमध्ये पुनरागमनाचे संकेत आधीच दिले आहेत. तिला ऑस्ट्रेलियन ओपनच्या दोन आठवड्यांपूर्वी खेळवल्या जाणाऱ्या ऑकलंड, न्यूझीलंडसाठी वाइल्डकार्ड देखील मिळाले आहे. मेलबर्नसाठी तिच्या तयारीचा एक भाग असलेल्या होबार्ट स्पर्धेतही तिने नावनोंदणी केली आहे.
पुन्हा एकदा, या ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यात, व्हीनस वेळ आणि वयाच्या मर्यादांना तोंड देऊ शकते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिचा अनुभव आणि दीर्घ कारकिर्दीचा प्रवास तिला मेलबर्न पार्कमध्ये एक मजबूत दावेदार बनवणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे