
सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.)। टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात भागिदारी करून चारचाकी गाडी घेण्यासाठी तब्बल 74 लाख 67 हजार रुपये घेऊन परत न केल्याने एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्निल बाबुराव काळे ( रा. कविता नगर पोलिस लाईन, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
फिर्यादी वासंती सूर्यकांत येळे (वय 39, रा. माशाळ वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) यांच्या ओळखीचे असलेले संशयित स्वप्निल काळे यांचा परिचय होता. दोघांमध्ये टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स व्यवसाय करू, त्यासाठी चारचाकी गाड्या घ्याव्या लागतील, गाड्या मी चालवतो आणि त्यातील नफा तुम्हाला देतो असे आमिष सूर्यकांत काळे याने वासंती येळे यांना दाखवले. त्यासाठी 2020 पासून वेळोवेळी सोने गहाण ठेवून पैसे घेतले तसेच त्यावर बँकेतून कर्ज काढून पैसे घेतले. परंतु, त्यानंतर व्यवसायाचा कोणताच परतावा दिला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड