
नाशिक, 08 जानेवारी (हिं.स.)।विविध ठिकाणी चोरांनी चोरलेले सुमारे एक कोटी दोन लाख रुपयांचे मोबाईल तपासामध्ये शोधून ते मूळ मालकांना महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनिषा खत्री , पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ज्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांमध्ये गुरुवारी परत देण्यात आले. यावेळी अनेक मोबाईल धारकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले
मागील काही दिवसापासून सातत्याने नाशिक पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रामध्ये पोलिसांची कामगिरी ही अतिशय उल्लेखनीय होत आहे अनेक गुन्हेगारांवरती महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अंकुश ठेवल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या गुनहामध्ये देखील तपासाचे काम पोलिसांनी सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून वाढत्या मोबाईल चोरीच्या तक्रारी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी मोबाईल चोरांकडून मोबाईल शोधून ते मूळ मालकांना दिले आहेत. सुमारे 535 मोबाईल असून त्याची किंमत एक कोटी दोन लाख 37 हजार रुपये आहे.
गुरुवारी नाशिक पोलीस आयुक्तालयात महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनिषा खत्री , पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त श्रीमती. मोनिका राऊत, किशोर काळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, सर्व विभागीय सहा. पोलीस आयुक्त, तसेच मोबाईल शोध पथकाचे पथक प्रमुख संदिप मिटके, पथकातील सपोनि. जया तारडे, परि. पोलीस उप निरीक्षक अफरोज शेख, पुनम नाईक, सुनिल हांडगे यांच्या अथक मेहनतीने नागरीकांना गहाळ झालेले मोबाईल परत मिळवुन देण्यास कामगिरी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV