
परभणी, 08 जानेवारी (हिं.स.)। ताडकळस येथील बाजार परिसरात विनापरवाना तलवार बाळगणार्या 19 वर्षीय युवकास ताडकळस पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले. या प्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण किशन माने (वय 19, रा. हाटकर गल्ली, ताडकळस, ता. पूर्णा) हा गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास येथील बाजार परिसरात स्टील रंगाची मुठ व पाते असलेली सुमारे 30 इंच लांबीची तलवार विनापरवाना बाळगत असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकार्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित शस्त्र बेकायदेशीररित्या बाळगताना तो मिळून आल्याने पोलिसांनी त्यास तलवारीसह ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार गजानन मोरे यांच्या8 मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, राहुल वडमारे, वेदप्रकाश भिंगे व विजय चव्हाण यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पोलीस अंमलदार सतीश शिवाजीराव तावडे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नामदेव सुजलोड हे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis