
परभणी, 08 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेंतर्गत निवडणूकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची शुक्रवार 9 जानेवारी रोजी परभणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर म्हणजे स्टेशन रस्त्यावर ही सभा दुपारी 1.30 वाजता होणार असून या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शरदचंद्र पवार गटातील नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेस नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राजेश विटेकर, प्रथम महापौर तथा महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, अक्षय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे आदींनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis