चंद्रपूर : महापालिका निवडणुकीत एक गुन्हा दाखल
चंद्रपूर, 09 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था तसेच आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात एक गुन्हा दाखल झाला आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात एक गुन्हा दाखल झाला असून ७.१५ लाख किमतीचे १ हजार ९४५ लिटर मद
चंद्रपूर : महापालिका निवडणुकीत एक गुन्हा दाखल


चंद्रपूर, 09 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था तसेच आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात एक गुन्हा दाखल झाला आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात एक गुन्हा दाखल झाला असून ७.१५ लाख किमतीचे १ हजार ९४५ लिटर मद्य जप्त करण्यात आलेले आहे. दरम्यान निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी 'स्वीप' अंतर्गत विविध माध्यमातून प्रसिद्धी नागरिकांशी थेट संवाद, पथनाट्य, रांगोळी, चित्रकला, निबंध, प्रश्नमंजुषा, रिल्स, सेल्फी स्पर्धा, बाईक रॅली यासह विविध उपक्रम घेण्यात येत असल्याची माहिती माहिती देत यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती असल्याची माहिती आयुक्त अकुनुरी नरेश यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande