
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)। डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात पुणे मेट्रो मंजूर झाली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून मेट्रोसाठी मदत दिली जात आहे, असे सांगत ‘मेट्रो आम्हीच आणली’ असा दावा करणाऱ्या भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरसा दाखविला. कचरा, पाणीटंचाई, खड्डे, वाहतुकीची समस्या, प्रदूषित हवा, पर्यावरणाचे वाढते धोके, हे महापालिकेतील मूलभूत प्रश्न आहेत. याकडे दोन्ही महापालिकांमधील कारभाऱ्यांनी दुर्लक्ष केले, अशी टीकाही पवार यांनी केली.
महापालिका निवडणुकीसाठी पुण्यातील पाच प्रश्नांवर जागृती करणारी ‘अलार्म’ मोहीम पक्षाने सुरू केली. त्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी विविध प्रश्नांना उत्तरे देताना भाजपची पोलखोल केली. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सभेत ‘मागील पाच वर्षांत आम्ही काय केले, हे विचारत असतील तर त्यांनी आरसा बघावा’ अशी टीका करत अप्रत्यक्ष पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु