नाशिक-‘कुंभ पर्वातील अमृत वचन‘ नावाने भाजपचा जाहिरनामा प्रसिध्द
नाशिक, 08 जानेवारी (हिं.स.)महापालिका निवडणुकांचा प्रचारात रंग भरण्यास सुरुवात झाली असून विविध पक्षांचा पुढील पाच वर्षांमध्ये आपण शहराला काय देणार आहोत. याची माहिती जाहिरनाम्यातून दिली जात आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचा ’कुंभ पर्वातीली अमृत
कुंभ पर्वातील अमृत वचन


नाशिक, 08 जानेवारी (हिं.स.)महापालिका निवडणुकांचा प्रचारात रंग भरण्यास सुरुवात झाली असून विविध पक्षांचा पुढील पाच वर्षांमध्ये आपण शहराला काय देणार आहोत. याची माहिती जाहिरनाम्यातून दिली जात आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचा ’कुंभ पर्वातीली अमृत वचन’ या नावाने जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला. भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी हा वचननामा प्रसिध्द केला.

यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, शहर सरचिटणीस नाना शिलेदार, सुनील देसाई, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रसिध्दीप्रमुख पियुष अमृतकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

विकसित शहरासाठी आम्ही कटिबद्ध

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन प्रगतीसाठी आधुनिक शहरी नियोजन, तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा, डिजिटल प्रशासन, हरित ऊर्जा आणि टिकाऊ पायाभूत सुविधा यांचा व्यापक वापर करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. राज्य शासनाच्या ’स्मार्ट आणि शाश्वत विकसित महाराष्ट्र’ या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून नाशिकला ग्रीन एनर्जी, सोलर उपक्रम, स्मार्ट डेटा-सिस्टम, ई-गव्हर्नन्स, क्लीन टेक्नॉलॉजी आणि हरित पायाभूत सुविधा यांच्या सहाय्याने शहर म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

स्थानिक गरजांशी जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्नभाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, नाशिक ही केवळ धार्मिक व ऐतिहासिक ओळख असलेली नगरी नसून, भविष्यातील आधुनिक, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शहर म्हणून उभारण्याची अपार क्षमता असलेली महानगरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या अमृतकालाच्या संकल्पनेतला नाशिकच्या स्थानिक गरजांशी जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ‘अमृत वचन‘ मधून दिसून येतो.

व्यवस्थापन हाच आमचा मुख्य केंद्रबिंदूराज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, हरित नाशिकच्या दिशेने राजमुंद्री येथून १५ हजार वृक्ष नाशिकमध्ये आणण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संरक्षणातील हे योगदान नाशिकच्या हरित भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. आगामी कुंभमेळा शहराच्या दीर्घकालीन विकासाला नवी दिशा देणारा तर ठरेलच परंतु नाशिकच्या दैनंदिन नागरी गरजांची उन्नती आणि सुयोग्य व्यवस्थापन हाच आमचा मुख्य केंद्रबिंदू राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande