
छत्रपती संभाजीनगर, 8 जानेवारी, (हिं.स.) - बालविवाह मुक्त भारत या उपक्रमानिमित्त येथील आदर्श महाविद्यालयात बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले यांनी उपस्थितांकडून बालविवाह न करण्याची व रोखण्याची प्रतिज्ञा घेतली.
या प्रसंगी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे प्रकल्प प्रमुख संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, प्राचार्य विलास आघाव तसेच प्राध्यापक आकाश बांगर, गजानन चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवृंद, महिला कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच बालविवाह मुक्त भारत उपक्रमांतर्गत श्री खंडोबा व येडोबा यात्रेनिमित्त हिंगोली तालुक्यातील कलगाव येथेही बालविवाहाबाबत जनजागृती करण्यात आली. या वेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे तसेच दर्शनासाठी आलेले भाविक उपस्थित होते.या उपक्रमांद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी तसेच चाईल्ड हेल्पलाईन 1098 विषयी माहिती देऊन समाजात जागृती निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis