
परभणी, 08 जानेवारी (हिं.स.)। नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत परभणी येथील अनुभूती विद्या विहार शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत संभाजीनगर, नांदेड व परभणी जिल्ह्यातील 30 शाळांमधून सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत अनुभूती विद्या विहार शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी पटकावल्या. इयत्ता दुसरीतील अर्थव चव्हाण याने अबॅकस चॅम्पियन हा मान मिळवला, तर इयत्ता पाचवीतील श्रीजा गुट्टे हिने अबॅकस व्हिज्युअलायझेशन चॅम्पियन हा किताब पटकावला. याशिवाय अबॅकस बेस्ट परफॉर्मन्ससाठी इयत्ता पहिलीतील सिद्धी परदेशी, इयत्ता तिसरीतील समर्थ गयाळ व शिवदीप शिंदे, इयत्ता चौथीतील कृष्णा सूर्यवंशी तसेच इयत्ता सातवीतील समृद्धी पंढरकर यांनी ट्रॉफी मिळवून शाळेच्या यशात भर घातली. या यशासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. मिनल धावंडकर यांचे मार्गदर्शन तसेच अबॅकस शिक्षिका सौ. विद्या कुलकर्णी यांच्या अथक परिश्रमांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis