पुणे- प्रभागातील नाराज कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांना धास्ती
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)पुणे महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी केवळ सहा दिवस उरले आहेत. मात्र, भाजपसह सर्वच पक्षांतील नाराज कार्यकर्ते अद्यापही प्रचारात उतरलेले नाहीत. त्यातच उमेदवारी डावलेल्या काही नाराजांनी निवडक कार्यकर्तेबरोबर घेऊन अने
bjp


पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)पुणे महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी केवळ सहा दिवस उरले आहेत. मात्र, भाजपसह सर्वच पक्षांतील नाराज कार्यकर्ते अद्यापही प्रचारात उतरलेले नाहीत. त्यातच उमेदवारी डावलेल्या काही नाराजांनी निवडक कार्यकर्तेबरोबर घेऊन अनेक प्रभागांमध्ये क्राॅस व्होटिंगसाठी मोर्चबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी क्रॉस व्होटिंगची धास्ती घेतली आहे. काही राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या पालिकेेच्या सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली. त्यानंतर पुणे महापालिकेेवर साडेतीन वर्षे प्रशासक राज होते. आता पालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्ते इच्छुक होते, तर अनेक माजी नगरसेवकांनी प्रभागातील इतर सक्षम कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकीची तयारी केली होती. पण, भाजपने ४० माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना उमेदवारी दिली नाही. त्यात इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या सुमारे दोन डझन जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande