
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात स्थिर सर्वेक्षण पथके नेमण्यात आलेली आहेत. मिटमिटा येथील पथकाने वाहनाच्या तपासणीत आढळलेली २.२५ लाख रुपयांची रोकड जप्त केली.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच अवैध रोख रकमेच्या हालचालींवर आळा घालण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या विविध रस्त्यांवर स्थिर सर्वेक्षण पथके नेमण्यात आली आहेत. मिटमिटा येथील ज्योती मंदिर येथे फॉक्स वॅगन गाडी तपासणीसाठी थांबाविली. तपासणीदरम्यान गाडीच्या
डॅशबोर्डमध्ये ५०० रुपयांच्या एकूण ४५० नोटा आढळून आल्या. या नोटांची एकूण रक्कम २ लाख २५ हजार रुपये असून या रकमेबाबत वाहन चालक रामसिंग सुलाने यांना समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरतअसल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पथक प्रमुख नागेश डित्ती यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पथक प्रमुख नागनाथ कांबळे, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ टाक, योगेश पाटील, आचारसंहिता कक्ष प्रमुख सविता सोनवणे, जावेद काझी, रोहित मिसाळ, प्रभाकर गोदे यांनी पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis