
सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात हा प्रत्यय सोलापूरकरांना वेळोवेळी आला आहे. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी, विमानसेवा आणि आयटी पार्क नंतर देवा भाऊ सोलापूरकरांना काय भेट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरात एकच चर्चा आहे ती म्हणजे दहा तारखेला हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचीगेल्या पंधरा वर्षापासून बंद पडलेली सोलापूरची विमान सेवा सुरू करण्याचे आश्वासन देवा भाऊंनी दिले आणि ते पूर्णत्वास नेले. सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली नंतर सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू आहे. यापुढे सोलापूरहुन तिरुपती बेंगलोरु विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे.दहिटणे येथे झालेल्या कार्यक्रमात देवाभाऊंनी सोलापुरात आयटी पार्कची करण्याची घोषणा केली आणि काय, अवघ्या चार महिन्यात आयटी पार्कसाठी जागा निश्चीत होऊन काम सुरु झाले. लवकरच आयटी कंपन्यां सोलापुरात सुरु होतील आणि हजारो तरुणांना काम मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड