
लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)।
: राज्यात २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र त्याआधी एक महत्वाची राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तब्बल ३८ अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहिती नुसार एकाचवेळी भाजप आणि काँग्रेसला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी लातूरमध्ये मोठी खेळी खेळणार असल्याचे समजते. तब्बल ३८ अपक्ष उमेदवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे.
लातूर महानगर पालिका निवडणूक -२०२६ एकूण प्रभाग १८, जागा ७० असून यात भाजप ७० सर्व जागा स्वतंत्र लढत आहे.
काँग्रेस - वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून ७० पैकी ६५ जागेवर काँग्रेस ०५ जागेवर वंचित बहुजन आघाडी.
राष्ट्रवादी अजित पवार गट दहा जागेवर पुरस्कृत उमेदवार उभे केले आहेत. -६०
राष्ट्रवादी शरद पवार गट - १७ जागेवर अधिकृत उमेदवार आहेत. स्वतंत्र लढत आहे.
शिवसेना शिंदे - ११ जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. तेही स्वतंत्र लढत आहे.
शिवसेना ठाकरे - ०९ जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. स्वतंत्र लढत आहे.
एमआयएम-०९ जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. स्वतंत्र लढत आहे.
लातूर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत काय घडले?
२०१४ मध्ये राज्य व देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर राजकीय वातावरण बदलले होते. त्याचा थेट फायदा लातूर भाजपाला झाला. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये सत्तांतर झाले. भाजपाचे नेते संभाजी
पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ३६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसला ३३ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना खाते उघडता आले नव्हते.
असे चित्र असताना आता एकनाथ शिंदे कोणती खेळी खेळणार याकडे लक्ष लागून आहे. अजून या बाबत स्पष्टता दिसून येत नसली तरी निवडणुकीत कांही घडते यामुळे हा अंदाज दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis