लातूर - सोयाबीनऐवजी ऊस लागवडीकडे शेतक-यांचा कल
लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)। अनियमित पावसाळा, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील चढ-उतार यामुळे सोयाबीन शेतीत अपेक्षित नफा मिळत नसल्याची भावना शेतक-यांमध्ये वाढत आहे. याउलट हमी बाजार, निश्चीत दर आणि तुलनेने स्थिर उत्पन्न देणारा ऊस शेतक-यांच्या पसंतीस
लातूर - सोयाबीनऐवजी ऊस लागवडीकडे शेतक-यांचा कल


लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)। अनियमित पावसाळा, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील चढ-उतार यामुळे सोयाबीन शेतीत अपेक्षित नफा मिळत नसल्याची भावना शेतक-यांमध्ये वाढत आहे. याउलट हमी बाजार, निश्चीत दर आणि तुलनेने स्थिर उत्पन्न देणारा ऊस शेतक-यांच्या पसंतीस उतरू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनऐवजी ऊस लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढताना दिसत आहे.

सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव, बियाणे, खते, औषधांचा वाढता खर्च आणि दरातील अस्थिरता यामुळे जोखीम अधिक असल्याचे शेतकरी सांगतात. दुसरीकडे, साखर कारखान्यांकडून मिळणारी खरेदीची हमी, वेळेवर उचल आणि उसासाठी मिळणारे अनुदान व तांत्रिक मार्गदर्शन यामुळे ऊस शेती अधिक सुरक्षित वाटत असल्याचे मत शेतक-यांतन व्यक्त होत आहे. विशेषत: ठिबक सिंचन, यांत्रिक कापणी (हार्वेस्टर) आणि सुधारित वाणांमुळे ऊस उत्पादन खर्चावर नियंत्रण येत असून पाण्याची बचतही होत आहे. परिणामी प्रति एकर उत्पादन वाढून शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळत असल्याचे अनुभवातून पुढे येत आहे. कृष्ीी तज्ज्ञाच्या मते, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार आणि बाजारपेठेचा विचार करून पीक निवड आवश्यक आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यास ऊस शेती शेतक-यांसाठी दीर्घकालीन व स्थिर उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande