नवोदय विद्यार्थिनीच्या मृत्यूची 'एसआयटी' मार्फत चौकशी करण्याची मागणी
लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १२ वर्षीय विद्यार्थिनी अनुश्री हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, याप्रकरणी जळकोट तालुक्यातील सकल मातंग समाज आक्रमक झाला आहे. प्रशासनाच्या मौनाविरोधात संताप व्य
नवोदय विद्यार्थिनीच्या मृत्यूची 'एसआयटी' मार्फत चौकशी करण्याची मागणी


लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १२ वर्षीय विद्यार्थिनी अनुश्री हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, याप्रकरणी जळकोट तालुक्यातील सकल मातंग समाज आक्रमक झाला आहे. प्रशासनाच्या मौनाविरोधात संताप व्यक्त करत, या घटनेची 'एसआयटी' मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदार राजेश लांडगे यांच्यामार्फत करण्यात आली आहे.

इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अनुश्रीचा वसतिगृहात संशयास्पद मृत्यू झाला. हा केवळ अपघात नसून व्यवस्थेच्या निष्काळजीपणातून झालेला संस्थात्मक अन्याय असल्याचा आरोप निवेदनात वेदनात करण्यात आला आहे. दोषींवर 'अॅट्रॉसिटी' आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत द्यावी आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी सरपंच बालाजी गुडसुरे, सुनील नामवाड, संग्राम नामवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. न्याय न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाने दिला असून, या घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह झाले आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande